रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे यांची प्रत्येक तालुक्यात गावात खेड्यापाड्यात अवैध धंदे करणाऱ्यावर करडी नजर



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे  यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्टिक स्पेशल ब्रांच अधिकारी श्री गजेंद्र सखाराम कराडे यांनी व सागरी पोलीस निरीक्षक श्री गोविंदराव पाटील साहेब यांना गुप्त बातमी दाराकडून मिळाल्या माहिती घेऊन पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे

दादर सागरी पोलिस ठाणे हद्दीत मांडूळ सापाचा विक्रीचा गुप्त बातमी दारा माध्यमातू पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्यादादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडुळ साप विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती त्यानुसार ता. २५ रोजी मुंबई गोवा महामार्गावर जिते गावाजवळ जय अंबे हॉटेल येथे ५ आरोपी यांनी हंडाई असेट कार ( नंबर एम एच ४७ एन ६००० ) मध्ये सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे (३) मांडुळ साप

प्रजातीचे वन्य जीव विक्रीसाठी आणले होते. आरोपींना पोलीसांकडून अटक करण्यात येत असताना पोलिसांना धक्का बुक्की करून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाच ही आरोपींना पकडून अटक केली आहे. याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे वन्य जीव संरक्षण अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक गोविंदराव पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post