इचलकरंजीत राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला उदंड प्रतिसाद

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण..

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे महालक्ष्मी महिला विकास संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने घोरपडे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य लावणी नृत्य स्पर्धेला महिला रसिकांचाउदंड प्रतिसाद मिळाला.या मध्ये'लावणी सम्राज्ञी' 'लावणी सम्राट' अशा महिला व पुरुष गटात स्पर्धा होवून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राची लावणी कला जीवंत रहावी , त्यातून चांगले कलाकार घडावेत या उदात्त हेतूने इचलकरंजी शहरातील महालक्ष्मी महिला विकास संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच घोरपडे नाट्यगृहात राज्यस्तरीय भव्य लावणी नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा तीन गटातून घेतल्या गेल्या. यातील लहान गटामध्ये प्रथम क्रमांक अनुष्का भंडारी, द्वितीय क्रमांक आर्निका एस. ,तृतीय क्रमांक तृप्ती काशिद व उत्तेजनार्थ ईश्वरा मिठारी यांनी तर पुरुष मोठा गटामध्ये प्रथम क्रमांक अशितोष किर्तीकर, द्वितीय क्रमांक शुभम बोराडे,तृतीय क्रमांक हरि बारगुळे,तर उत्तेजनार्थ पंकज चव्हाण यांनी पटकावला.तसेच मोठा गट महिलांमध्ये प्रथम क्रमांक ऋुतुजा सदाफुले, द्वितीय क्रमांक श्रुष्टी जाधव, तृतीय क्रमांक मयुरी धामणेकर तर उत्तेजनार्थ प्रिया नास्कर यांनी पटकावला‌.या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी सौ.मोहिनी खोत व सौ. दिपाली मांगले यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी सिने संगीतकार, चंद्रकांत जगताप,कोरे ,अरुण दळवी ,अरविंद मस्के ,असिफ संजापूरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी महालक्ष्मी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ‌ दिपा पुजारी , सेक्रेटरी कांचन गोरे , खजिनदार सिंधू गोरे , नागेश शेजाळे , ओमकार गोरे , शिवराज भादवनकर ,सॅम संजापूरे यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी अथक परिश्रम घेतले.या स्पर्धेला महिला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post