मंदिरात लाऊडस्पीकर लावा मात्र, मशिदीवरील भोंगे काढा ही मागणी क्रूर आहे... रामदास आठवले..


प्रेस मीडिया लाईव्ह :

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत.केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी राज यांना सल्ला दिला आहे. तुम्हाला कुठे भोंगे लावायचे ते लावा मात्र कुठे इतर ठिकाणीच भोंगे काढा ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा पक्षांना आमचा विरोध असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. अलीकडे राज यांचा तोल गेला असल्याचे रामदासआठवले यांनी म्हटले. रामदासआठवले हे लातूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

मंगळवारी झालेल्या सभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ईद पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे न काढल्यास मंदिरात लाऊडस्पीकरून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यावर आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी धमकी देता कामा नये असेही आठवले यांनी म्हटले. मनसेच्या झेंड्यात सगळे रंग होते. मात्र त्याच्या मागे कोणी गेले नसल्याचे त्यांनी म्हटले. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे त्यामुळे त्याचा गैरवापर करू नका असे आवाहनही आठवले यांनी केले. मंदिरात लाऊडस्पीकर लावा. मात्र, मशिदीवरील भोंगे काढा ही मागणी क्रूर असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवाजी महाराज यांना मानतात. त्यांची वैचारीक भूमिका ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी जोडणारी असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post