पुणे शहर घरफोडी करणा-या आरोपीस पोलिसांकडून जेरबंद

 सात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड.

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

लोणीकंद पो. स्टे. गु.र.क्र.६४१/२०२१ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा गुन्हे शाखा,युनिट-६ कडून समांतर तपास सुरू असताना,सदरचा गुन्हा हा पाटील इस्टेट येथील मोहन बनसोडे याने त्याच्या मावशी सोबत मिळून केला असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. सदर बाबत गणेश माने,पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा,युनिट-६, पुणे शहर यांना माहिती दिली असता, त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने सदर गुन्हयाचा तपास करत असताना, दिनांक ०९/०४/२०२२ रोजीसदर आरोपीचा शोध घेत असताना,तो पाटील इस्टेट पुलाच्या खाली,शिवाजीनगर,पुणे येथे आला असल्याचे माहिती मिळाल्याने त्याठिकाणी सापळा रचून आरोपी नामे मोहन देविदास बनसोडे,वय २१वर्षे,रा.लेन नं ७,पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे यास ताब्यात घेतले. 

नमूद गुन्हया मध्ये त्यास अटक करून त्याची दिनांक १३/०४/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त करून,पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे तपास करता,त्याने त्याच्या मावशी सोबत पुणे शहरा मध्ये लोणीकंद व डेक्कन पो. स्टे. मधील दोन गुन्हे व समर्थ, सिंहगड रोड व कोंढवा पो. स्टे.मधील प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गुन्हयातील ४,९६,०८५/- रु किचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच काही दिवसापूर्वी गुन्हयातील सहआरोपी त्याची मावशी इलेक्ट्रीक शॉक लागुन मयत झाल्याचे त्याने सांगितले आहे.

 सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीससह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उपआयुक्त,गुन्हे शाखा,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,श्री.गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक,नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह 

उप संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post