आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजिक तेढ निर्माण करण्यांना चाप बसणार

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - राज्यासह देशातील सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलीस या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत.चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट मुंबई पोलिसांनी हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत, ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत.

जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत, ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी, यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 अशा पोस्ट हटवत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडियावर लोकांची अॅक्टिव्हिटी कोरोनापासून खूप वाढली आहे, त्यामुळे अशा पोस्टची संख्याही वाढत आहे. सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे वक्तव्य राजकीय पक्षांकडून येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते. सोशल मीडियावरील सर्व पोस्टवर महाराष्ट्र पोलिस लक्ष ठेवून आहेत आणि विशेषत: समाजात कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण करू शकतात.

सोमवारी मुंबई पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडिया लॅब मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्रिय करण्यात आली आहे. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजिक तेढ निर्माण करण्यांना चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post