ज्या दिवशी न्यायालय जामीन मंजूर करेल त्याच दिवशी आरोपीची तुरुंगातून सुटका.सर्वेच्च न्यायालयाचा निर्णय.प्रेस मीडिया लाईव्ह :

 ज्या दिवशी न्यायालय  जामीन मंजूर करेल त्याच दिवशी आरोपीची तुरुंगातून सुटका झाली पाहिजे, असा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. जामिनाची कागदपत्रे त्याच दिवशी संबंधित तुरुंगाकडे पाठवावी, नंतर तुरुंग प्रशासन ती कागदपत्रे त्याच दिवशी कैद्याला देईल.अशा प्रकारे जामीन मंजूर झालेल्या दिवशीच आरोपीची तुरुंगातून सुटका करण्याच्या दृष्टीने कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. फौजदारी खटल्यांतील त्रुटींची स्वतŠहून दखल घेत खंडपीठाने यासंदर्भात झटपट कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले. जामीन मंजूर करण्यासंबंधीच्या नियमांनुसार अजामीनपात्र गुह्यांत सामान्यतः जामीन अर्जावरील पहिल्या सुनावणीनंतर तीन ते सात दिवसांच्या आत न्यायालयाने 'होय किंवा नाही' असा निर्णय द्यावा. या मुदतीत जामीन अर्ज निकाली काढला नाही तर न्यायालयाने विलंबाची योग्य कारणे आदेशात द्यावीत. तसेच आरोपीसाठी आदेशाची प्रत, जामीन अर्जावरील उत्तर आणि पोलिसांचा स्टेटस रिपोर्टही न्यायालयाने आदेश जारी करताना सोबत ठेवणे आवश्यक आहे, असेही सर्वेच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post