केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सलून व्यावसायिकां बदल केले घाणेरडे विधान

 पुणे शहर काँग्रेस कमिटी कडून नाभिक समाज व सलून व्यावसायिकांनी त्या वक्तव्याचा  निषेध केला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख : ( उप संपादक )

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काल एका जाहीर सभेत सलून व्यावसायिकां बदल घाणेरडे विधान केले होते त्या वक्तव्याचा  आज पुणे शहर काँग्रेस कमिटी कडून नाभिक समाज व सलून व्यावसायिकांनी त्याचा निषेध केला.हे आंदोलन पुणे रेल्वे स्टेशन जवळ निषेध करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले. या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेस कमिटीचे नगरसेवक रवींद्र धंगेकर, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, काँग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे, प्रवक्ते रमेश अय्यर नाभिक समाज व सलून व्यावसायिक, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध काँग्रेस कमिटी पुणे रेल्वे स्टेशनवर रेल रोको करून आंदोलन करणार होते पण त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली.रमेश बागवे म्हणाले, भाजपचे नेते वारंवार घाणेरडे विधान करीत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल बोलताना जरा विचार करून बोलायला पाहिजे होते पण त्यांनी न विचार करता त्यांनी घाणेरडे विधान केले.

सलून व्यवसाय व नभिक समाज हा काही रस्त्यावर पडला नाही. जर रावसाहेब दानवे यांनी माफी मागितली नाही तर आम्ही येथील पुढील काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू. असा इशारा रमेश बागवे यांनी दिला.नाभिक समाजाचे अध्यक्ष सोमनाथ काशीद म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजा रस्त्यावर पडला आहे. असे विधान केले आहे. त्याचा आम्ही काल पासून अख्या राज्यभर निषेध करत आहोत. रावसाहेब दानवे यांनी माफी मागितली नाही तर येथील पुढील काळात आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाईल .असे सोमनाथ काशीद म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post