भारतीय जनता पार्टीने सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीने सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

सत्यजित कदम हे माजी नगरसेवक असून ते पूर्वी काँग्रेस पक्षात होते. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सत्यजित कदम हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते शिवाजीराव कदम यांचे चिरंजीव आहेत.कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान पार पडणारा असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रभाव केला होता. पण कोरोना काळात त्यांचे निधन झाले. तेव्हा ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी आता पोटनिवडणूक होऊ घातली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post