रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार.. ..नाना पटोले

राज्यपाल हे भाज्यपाल झाले आहेत. ..नाना पटोले 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई: काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलीय नाना पटोले यांचं अमजद खान या नावानं फोन टॅपिंग करण्यात आलं होतं.येत्या सोमवारी 500 कोटींचा दावा रश्मी शुक्ला डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर ठोकणार आहे, असं नाना पटोले म्हणाले. येणाऱ्या काळात कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये, असं ते म्हणाले. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असून सूत्रधारांचा पर्दाफाश महाविकास  आघाडी सरकार केल्या शिवाय राहणार नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फोन टॅपिंग करण्यात आलं. आता रश्मी शुक्ला, डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काम सुरू केलंय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाला जे जबाबदार त्यांच्यावर कारवाई होतेय. जी-23 यांनी काय वक्तव्य केलं त्यावर सामनातून काय टिका झाली ते माहीत नाही, असं नाना पटोले म्हणाले. कांग्रेस देशाची विचारधारा असून कधी संपू शकत नाही, कुणी संपवू शकत नाही. येत्या काळात यावरही काम होईल, काँग्रेस सुधारणा करेल, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाचं राजकारण केलं. निवड थांबली, कुणीही राजकारण करणं घातक, भाजप नेत्यांनाही सांगणार हे थांबवा, असं नाना पटोले म्हणाले. राज्यपाल हे भाज्यपाल झाले आहेत. ते हायकोर्टात गेले, 10 लाख भरले, अनामत गेली, ते भाजपच्या लोकांचं ऐकतात.. ती राज्यपालांची भूमिका नव्हे, असं नाना पटोले म्हणाले. या सत्रात अध्यक्ष पदाची निवड होईल, असं देखील नाना पटोले म्हणाले

Post a Comment

Previous Post Next Post