राज ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर

आजच्या मेळाव्याच्या भाषणातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष ..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आपला पंधरावा वर्धापन दिन साजरा करत आहे. या वेळी मनसेचा वर्धापन दिन मुंबईत न होता पुणे येथे पार पडतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज, मंगळवार पासून तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.

मनसेचा हा वर्धापन दिन यंदा पुणे येथे पार पडत आहे. पुणे येथील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलतात आपल्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मनसे कामाला तर लागली आहे. मात्र, आजच्या मेळाव्याच्या भाषणातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (दि. ९) साजरा होणारा १६ वा वर्धापनदिन सोहळा यंदा पुण्यात होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून, त्यासाठी नाशिकमधून दहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post