पुण्यात ३२ लाख २२ हजार ७९०, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाख ३१ हजार ८८७ मतदार

 पुणे , पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांना मतदार याद्या सादर...

प्रेस मीडिया लाईव्ह  

जिलानी उर्फ मुन्ना शेख ( उप संपादक )

पुणे दि.९ महानगरपालिकेच्या मतदारांच्या विधानसभा मतदार संघनिहाय याद्या दोन्ही महापालिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

महापालिकेने प्रभागांनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने चालू वर्षी ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीचा आधार घेऊन प्रभागांच्या रचनांनुसार या याद्या तयार होणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८१ लाख ५८ हजार ५३९ आहे. त्यापैकी पुणे शहरात वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ अशा आठ विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आठ मतदार संघांमध्ये ३२ लाख २२ हजार ७९० मतदार आहेत. महापालिकेला या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.

शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक मतदार हडपसर विधानसभा मतदार संघात पाच लाख ५५ हजार ९१० आहेत. खडकवासला विधानसभा मतदार संघ दुसऱ्या क्रमांकावर असून या मतदार संघात पाच लाख ४० हजार ५७२ मतदार आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात चार लाख ७१ हजार १० मतदारांची नोंद झाली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये चार लाख ३४ हजार ५७५, पर्वतीमध्ये तीन लाख ५६ हजार २१२, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात दोन लाख ९० हजार ९१९, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात दोन लाख ८७ हजार ५३५ आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघात दोन लाख ८६ हजार ५७ मतदार आहेत, 

पुणे बरोबर  पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही अंतिम मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यापैकी चिंचवड मतदार संघात पाच लाख ६४ हजार ९९५, भोसरी मतदार संघात चार लाख ९८ हजार ९० आणि पिंपरी मतदार संघात तीन लाख ६८ हजार ८०२ असे एकूण १४ लाख ३१ हजार ८८७ मतदार आहेत.

अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

उप संपादक :  जिलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post