महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू होताच अनधिकृत व्यवसायिकांना जोरदार दणका

प्रशासनाने लागलीच मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्ते अतिक्रमण हटविण्याचा  निर्णय घेतल्याने खळबळ



प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख : ( उप संपादक )

पुणे :   महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्याने सर्व माननीय आजीचे  माजी झाले आहेत  त्यामुळे  महानगरपालिका प्रशासनाने लागलीच मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्ते अतिक्रमण हटविण्याचा  निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.


महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू होताच पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून शहर विद्रुपीकरण यात भर घालणाऱ्या अनधिकृत व्यवसायिकांना जोरदार दणका दिला आहे. पदपथ आणि इमारतीच्या मोकळ्या जागेवर सुरू असलेले बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे.

पदपथांवरील  सर्व बेकायदा कार्यालये, वाचनालये हटणार-शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत. तर काही ठिकाणी नगरसेवकांनी पदपथावर महानगरपालिकेच्या निधीतून वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे उभारले आहेत. ही स्ट्रक्चर्स देखील वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे पदपथांवरील बेकायदा कार्यालये, वाचनालयेदेखील हटविण्यात येतील. मात्र, महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेली वाचनालये व अन्य सुविधा हटविण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले 


अनवरअली शेख : सह संपादक :

Post a Comment

Previous Post Next Post