मोठमोठ्या बॅनरचे फक्‍त फ्लेक्‍स काढले जात असून

बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहिरात लावण्यासाठी तसाच ठेवण्यात येत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख : (उप संपादक )

पुणे – पुण्याला पहिल्या पाच शहराच्या यादी मध्ये ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जोरदार प्रयत्न सुरू असतानाच ,  शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सबाजीला महानगरपालिकाच खतपाणी घालत असल्याचे चित्र  दिसत आहे. एका बाजूला एखाद्या नागरिकाने अथवा व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला, पदपथावर अनधिकृत शेड अथवा बांधकाम केले असल्यास जेसीबी लावून कारवाईचा आव आणणाऱ्या अतिक्रमण आणि आकाश चिन्ह विभागाकडून रस्त्यावर लावलेल्या मोठमोठ्या बॅनरचे फक्‍त फ्लेक्‍स काढले जात असून बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहिरात लावण्यासाठी तसाच ठेवण्यात येत आहे.

आयुक्‍तांनी शहरातील अतिक्रमणे, पदपथ वरील फ्लेक्‍स, बोर्ड बॅनर्स, साईड मार्जिंन मधील बांधकामे काढण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभागाने या कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. कारवाई करताना कर्मचारी पत्रा शेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्‍स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्‍स काढतात. फ्लेक्‍ससाठी लावलेला बांबूच्या सांगाड्याला हातही लावत नाहीत. प्रत्यक्षात हे बांबू मोडल्यास अथवा जप्त केल्यास सांगाड्यासाठी बांबू देणारे अनधिकृत फ्लेक्‍ससाठी बांबू देणार नाहीत. मात्र, सांगाडे उभारणांशी “तोडपाणी’ होत असल्यानेच कारवाई होत नसल्याचे चर्चा  सुरू आहे 


Post a Comment

Previous Post Next Post