होते आमचे बापू सर्वांचे बापू .. सर्वांना आधार देणारे , मदत करणारे..



प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील :

सुख आणि दुःख हे प्रत्येक व्यक्तीच्या  वाटेलाच असतात त्या शिवाय जीवनाचे महत्व प्रत्येकाला समजत नाही असे सतत प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे  धनाजी बालाराम घरत हे खारपाडा गावचे सरपंच होते ,  शिवाय समाजकार्याची आवड , न्यायनिष्ठुर नीतिमत्ता जोपासणारे आणि गावातील व परिसरातील न्याय  करण्याचे सतत प्रयत्न करत असत . साल 1989 साली  रसायनी पाताळगंगा नदीला महापूर आलेला असताना त्या  आलेल्या महापुरातून शेकडो  कुटुंब उद्ध्वस्त झाले होते , त्यावेळी  त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खारपाडा  परिसरात नदीलगत असलेली घरे त्या घरांच्या अडकलेली लोक मुलं बाळे यांना जीवदान देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी त्या वेळी अगदी निस्वार्थ पणे  केले होते .

घरत यांचा मूळ व्यवसाय वीट भट्टी तसेच भाजीपाला , भाजीपाला हा व्यवसाय म्हणून ते करत नसतं . कोणी मित्र मंडळी त्यांच्या घरी आले तर त्यांना भाजीपाला भेट म्हणून देत असत . या शिवाय पाण्याचा डिझेल इंजिन तसेच समुद्रातील बोटी यांचे डिझेल इंजिन कोणी आदिवासी ठाकूर कोणी ही त्यांना फोन करून किंवा घरी न्यायला येऊ द्या कधीच कोणाला नाही म्हणत नसत.  खारपाडा या परिसरातील कासार भाट रावे आपटा गुळसुंदे चावणे सवणे कालीवली तारा बारापाडा जिता खरोशी पेन रिस साई दिघाटी केलवणे खरोशी उरण पनवेल खालापूर पाली परिसराततुन कामासाठी फोन येत असत त्या ठिकाणी कोणाला कधी नाही म्हंटले नाही व कधी मन दुखवत नसत . आणि तेथे जाऊन  कोणाचा डिझेल इंजिन बिघडला असेल तर तेथे जाऊन  त्याचं काम पूर्ण करून देत असत , अशा वेळी जेवणाची पर्वा न करता त्यांचं काम करून द्यायचे असे होते आमचे  व सर्वांचे बापू....

बापू चे मुलगाव खारपाडा त्यांच्या पत्नी शांताबाई तार्‍या या गावच्या तारा हा मामा मावशी पूर्ण गाव नात्याने भरलेला असून बापू यांनी आपल्या गोड स्वभावाने सर्वांची मने जिंकली . कधी कुणाला दुखावले नाहीत बापूंचे कुटुंब फारच मोठे आहे मध्ये बहिणी व त्यांचे भाचे व त्यांचा परिवार बाबूंची आत्या व त्यांची मुले व त्यांचा परिवार बापूचा चुलत भाऊ व त्यांच्या पत्नी व त्यांचा परिवार खारपाडा गावातील घरत परिवार पाटील परिवार भगत परिवार खारपाडा गावातील कोळीवाडा तील सर्व जिवलग मित्र बापूंचे दुःखद निधन झाल्याचे समजतात  संपूर्ण गाव पूर्णपणे अंधारात बुडाले आहे.

बापूंनी आपले जीवन लहानपणा पासून खारपाडा या गावात त्यांच्या मित्र मंडळी सोंगाड्या सोबत घालवले. ते कसे दिवस काढले तेथील लोक आज पण आठवणी सांगतात . सर्वाँना बापूंचा स्वभाव माहित आहे खूप प्रेमळ लहानशी मोठ्यांची थोरांची  कशी बोलणे त्यांची असायची कोणताही प्रसंग कुठे असो गावात इतर ठिकाणी त्याच्यातून सल्ला काढणे आणि त्यांना मदत करणे हे त्यांचे नेहमीचे काम असायचे  .कै धनाजी बालाराम घरत त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शांताबाई धनाजी घरत मुलगा सुरेंद्र धनाजी घरत सून सौ शोभा सुरेंद्र घरत ग भा मनीषा रवींद्र घरत मुलगी सौ राजश्री पाटील सौ अस्मिता पाटील सौ मेघना निळकंठे नात सौ पल्लवी पाटील कुमार मीतू पाटील कुमार प्रसाद पाटील कुमारी श्रेया पाटील कुमार धीरज कुमारी दर्शना कुमारी सृष्टी कुमारी स्वरुपा कुमार स्वराज कुमारी मनस्वी कुमारी स्नेहा कुमार रोनीत कुमारी पौर्णिमा कुमारी श्रावणी कुमार केतन कुमार वेदांश

बापू टाटा कंपनी मध्ये होते मुंबई मध्ये बरेच ठिकाणी टाटा चे टावर त्यांनी उभारले आहेत त्यांच्या हातामध्ये कळा होत्या हुशार चाणाक्ष बुद्धी पण बापू आज आम्हाला सर्वांना एकाकी सोडून गेले आणि आज आमच्यावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे आमचे बापू आम्हाला परत कधी भेटतील जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अशा जिवाला होणाऱ्या वेदना आयुष्यात जाणार नाही ही असे होते आमचे बापू सर्वांचे बापू ..सर्वांना आधार देणारे , मदत करणारे.. 


28 03 2022 रोजी उध्दर रामेश्वर पाली येथे दशक्रिया होणार आहे

31 03 2022 राहत्या घरी खारपाडा येथे टोलनाक्याजवळ तेरावे धरले आहेत


Post a Comment

Previous Post Next Post