छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालेनंतर

 


आज  दुपारी या पुतळ्याचा मेघडंबरी काही भाग कोसळून पडला. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनी निदर्शनास आणून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे महानगरपालिके मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. आज  दुपारी या पुतळ्याचा मेघडंबरी काही भाग कोसळून पडला. ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनी निदर्शनास आणून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.


याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख आणि काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी या घटनेबद्दल भाजप सरकारचा तीव्र निषेध केला असून या गोष्टीबद्दल कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी प्रशांत जगताप यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडी मध्ये बसवण्यात आला आहे. त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते झाले होते आणि त्यानंतर अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन देखील झाले. या कार्यक्रमाला काही तास होत नाही. तोवर क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेताना, मेघडांबरीचा काहीसा पुढील भाग पडला आहे. यावरून शिवप्रेमीनी नाराजी व्यक्त केली असून यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Post a Comment

Previous Post Next Post