प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी डॉ. जे.एफ. पाटील व उपाध्यक्षपदी डॉ.अशोक चौसाळकर यांची निवड

                       

                         प्रा.डॉ.जे.एफ.पाटील

                           

  

                     प्रा.डॉ.अशोक चौसाळकर

इचलकरंजी ता. ७ वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ अर्थतज्ञ व प्रबोधिनीचे स्थापनेपासूनचे सदस्य प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांची निवड करण्यात आली. तर ज्येष्ठ राज्यकीय विश्लेषक व प्रबोधिनीचे स्थापनेपासूनचे सदस्य प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांची उपाध्यक्षपदी विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी प्रास्तविकातून प्रबोधिनीच्या पंचेचाळीस वर्षाच्या  वाटचालीचा आढावा घेतला.तसेच प्राचार्य ए.ए.पाटील, प्राचार्य म.द.देशपांडे,आचार्य शांताराम गरुड आणि प्रा.डॉ.एन.डी.पाटील या प्रबोधिनिच्या आजवरच्या चार अध्यक्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांचे योगदान अधोरेखित केले.त्यानंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नावाचा कार्यकारीणी मंडळाने मंजूर केलेला प्रस्ताव विशेष सर्वसाधारण सभेपुढे सूचक म्हणून ठेवला.त्याला प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील,प्रा.डॉ.भारती पाटील,ऍड.अजित सूर्यवंशी,दशरथ पारेकर,प्रा.शिवाजीराव होडगे,प्रा.विजयकुमार जोखे , प्रा.डॉ.संजय साठे,प्रा.रमेश लवटे आदी सदस्यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर एकमताने ही निवड करण्यात आली.यावेळी अनोदकांसह अनेक सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनह पुढील वाटचालीबाबत विचार मांडले.

प्रा.डॉ.जे.एफ.पाटील म्हणाले,समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन कार्याला साडेचार दशकांची सातत्यपूर्ण व उपक्रमशील परंपरा आहे. आचार्यशांताराम गरुड, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे ,प्रा.डॉ.एन.डी.पाटील आदी दिग्गज विचारवंत नेत्यांनी समाजवादी प्रबोधिनीची केलेली स्थापना आणि आज अखेर दिलेले नेतृत्व ही आपली जमेची बाजू आहे.आपल्याला त्यांची विचारधारा घेऊन अधिक सामूहिकपणे व  सक्षमपणे वाटचाल करुया. यावेळी नूतन उपाध्यक्ष डॉ.अशोक चौसाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.अनिल उंदरे,रत्नाकर गोंधळी,डॉ.चिदानंद आवळेकर, शशांक बावचकर, राहुल खंजिरे,सौदामिनी कुलकर्णी, डॉ.डी.जी.चिघळीकर,अन्वर पटेल ,पांडुरंग पिसे, यांच्यासह प्रबोधिनीच्या विविध शाखांचे प्रतिनिधी ,सभासद उपस्थित होते.

फोटो : समाजवादी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभेला संबोधताना प्रा.डॉ.जे.एफ. पाटील, मंचावर सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी ,सहचिटणीस प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील ,नूतन उपाध्यक्ष डॉ.अशोक चौसाळकर व   कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ. भारती पाटील

.

Post a Comment

Previous Post Next Post