पिंपरी चिंचवड शहर आजाद समाज पार्टी मध्ये महिलांचा प्रवेश..

 पिंपरी चिंचवड शहर महिला शहराध्यक्षपदी अनिता रिडलान यांची नियुक्ती...

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड दि.15 आजाद समाज पार्टी पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष पदाची निवड नुकतीच पार पडली. रहीम भाई सय्यद यांची पक्षवाडीकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

भिम आर्मी संस्थापक व आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद तसेच प्रदेश अध्यक्ष नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष रहीमभाई एम. सय्यद यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हा महिला अध्यक्ष स्वातीताई गायकवाड तसेच पुणे शहराध्यक्ष अर्चनाताई केदारी यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य महिलांनी पक्ष प्रवेश केला, यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष स्वातीताई *गायकवाड यांच्या हस्ते अनिताताई रिडलान यांची महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली* त्याचबरोबर आशा बोरडे उपाध्यक्ष,नंदा रोकडे उपाध्यक्ष, सुनीताताई टाक संघटक प्रमुख तसेच पूर्णिमा पाखरे शहर महासचिव व नीलम राऊत यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली,

पुणे जिल्हाध्यक्ष स्वातीताई गायकवाड यांनी महिलांना संघटनाचे बळ व संघटन वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच पुणे शहराध्यक्ष अर्चनाताई केदारी यांनी सर्व नवनियुक्त महिलांना शुभेच्छा दिल्या सर्व महिला पदाधिकारी यांना येत्या निवडणुकीसाठी सज्ज होत शहरांमध्ये पक्षाचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक रूप पद्धतीने संघटन वाढीवर जोर देत एकत्रितपणे कार्य करू असे आश्वासन शहराध्यक्ष रहीमभाई सय्यद यांनी दिले व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष या नात्याने पक्षात स्वागतयुक्त  अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या वेळी  पिंपरी-चिंचवड शहर संघटक रमजान मकानदार, विजय ओव्हाळ, देवगुण इंगळे व इतर पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अन्वरअली शेख :  ( सह संपादक )  

संपर्क.9975071717

 

Post a Comment

Previous Post Next Post