महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधे मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांना दफनभूमी साठी जागा मिळावी...धर्मपाल तंतरपाळे
प्रेस मीडिया लाईव्ह
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड दि. २२ महापालिकेचा पूर्वीचा प्रभाग क्रमांक १६ व नवीन झालेल्या प्रभाग क्रमांक २४ मधील विकास नगर, किवळे, मामुर्डी, रावेत मधील जनतेला नागरि सुविधा मिळाव्या आणि विकासापासून वंचित राहिलेल्या या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी धरणे आंदोलन उपोषण पुकारले आहे. किवळे मुकाई चौक बीआरटी रोड लगत या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
त्या वेळी , धर्मपाल तंतरपाळे,हनुमंत राऊत,अरुण जगताप,सुनील ननवरे,मेघराज तंतरपाळे,रवींद्र पवार,किरण, अन्वर तांबोळी,इकबाल शेख, प्रज्वल वानखेडे,गणेश,आशा शेटलू,बेबी अडागळे,मिरा खान,ताराबाई खंडागळे,आदी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रकारे आहेत मागण्या.....
१)किवळे रावेत मामुर्डी विकास नगर मधील आरक्षणे ताब्यात घेऊन विकासित करावी. प्रभागांमध्ये ग्राउंड ,उद्यान, विरंगुळा केंद्र ,खेळाचे मैदान, दवाखाना ,करसंकलन कार्यालय, मध्यभागी फूट, वाचनालय, सांस्कृतिक भवन, इत्यादी करावे.
२) विकास नगर शिंदे पेट्रोल पंप ते एम बी कँप पर्यंत रस्ता रुंदीकरण करावा व फुटपात करावे.
३) बँक ऑफ बडोदा किवळे शाखे समोरी लाईटची डीपी व अलीकडील झाडे हलवावी व रस्ता रुंदीकरण करावा.
४)आरक्षीत जागेवर नियोजित आरक्षणाचे फलक लावावे .
५) सर्वे ७१ मधील भिमाशंकर नगर ते सरपंच वस्ती रस्ता १० फुटी डांबरीकरण करावा . ६)प्रभागातील डी . पी . आरक्षीत रस्ते ताब्यात घ्यावी संबंधीत जागा मालकांना त्याचा मोबदला द्यावा जर जागा देत नसतील तर चिखली , मोशी , मंध्ये जसे आरक्षणे ताब्यात घेतली त्या पद्धतीने आरक्षणे ताब्यात घ्यावी .
७) शास्तीकर ००१ ते २००० चौ . फुटा पर्यन्त संपूर्ण माफ करावा . ८) पिण्याचे पाणी दरोरोज सोडावे .
९ ). मुस्लीम बांधवाना व ख्रिश्चन बांधवांना दफन भुमीला जागा द्यावी .
१०) . इंद्रप्रभा बिल्डींग समोरील सर्वीस रस्त्या मधील स्ट्रीट लाईट पोल बाजुला करावे व तीथे इंद्रप्रभा बिल्डींगच्या लोकासाठी मीनी मार्केट करावे व फुटपात करावे .
११) किवळे गांव संपूर्ण देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करावे तसे पत्र मा . पोलीस आयुक्तांना दयावे .
१२)किवळेगांव स्माशन भुमीवर लाईट कनेक्शन दयावे व विसावा वटा उंच करावा व मुतारी , शौचालय बांधावे .
१३) किवळे गांव ते सर्बेरा हॉटेल चौक वृक्षारोपण करावे.
१४) मुकाई चौकात श्री छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा मंध्यभागी उभारावा . टी.सी. कॉलनी ते इंद्रप्रभा बिल्डींग मार्ग मुकाई चौक कडे जाणारा नविन रस्ता जो पर्यन्त लाईटचे टॉवर हटवत नाही तो पर्यंन्त सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करु नये, हा रस्ता बिल्डर लोंकासाठी बनवीला आहे. सर्व सामान्य लोंकासाठी नाही टॉवर मुळे वाहने धडकून अपघात होईल .
१५) सर्वे ७३ भिमाशंकर नगर येथील आरक्षण आर्थिक दुर्लब घटकासाठी घरे बांधण्यासाठी आहे ते आरक्षण ताब्यात आहे . तीथे गोरगरीबांना घरे दया.
१६) प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्यात यावे.
१७) इंद्रप्रभा सोसायटी ते मुकाई चौक किवळे पर्यंतचा रस्त्यावर साईडला नागरिकांना चालण्यासाठी फूटपात किंवा रस्ता डांबरीकरण करावे. अशा विविध मागण्या फुले.शाहू. आंबेडकर. विचारमंचच्या वतीने करण्यात आलेले आहेत.