किवळे -रावेत परिसरात प्रथमच फुटबॉल मॅच चे आयोजन.महिला पुरुष खेळाडूंनी घेतला सहभाग*

तक्षक फुटबॉल क्लबच्या वतीने खेळाचं आयोजन..

महान क्रिकेटपटू शेन वार्न यांना श्रद्धांजली देऊन फुटबॉल मॅच ला केली सुरुवात.


प्रेस मीडिया लाईव्ह 

अनवरअली शेख (सह संपादक )

पिंपरी चिंचवड दि.९ किवळे रावेत येथली आयटी कंपनी कामगारांनसाठी फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन 

गेली दोन वर्षे टाळेबंदीत आय टी हब किंवा खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.. या कामाचा थेट परिणाम शरीराच्या स्वास्थ्यशी निगडित असल्याने कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी अगदी मेटाकुटीला आले होते, अश्यातच,सामाजिक कार्यकर्ते शिवसेना नेते निलेश तरस सोशीयल फाउंडेशन आणि तक्षक फुटबॉल क्लब यांच्या सयुंक्त आघाडीने दोन दिवसीय फुटबॉल मॅचेस भरवल्या यात सर्व  आयटीएंस एकत्र येऊन फुटबॉल च्या खेळाचा आनंद घेण्यासाठी एकत्र आले.या खेळात महिला आणि पुरुष यांच्या फुटबॉल मॅच चे आयोजन देहूरोड च्या रावेत येथील बंदिस्त मैदानावर घेण्यात आले.तर दुसरीकडे कोरोनाचं सावट कमी होते असल्यामुळे अनेक निर्बंध कमी करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने चौदा जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहे.दोन वर्षांपासून घरातून काम केल्याने,हे सर्व खेळाडू खेळताना मोकळा श्वास घेण्यासाठी आतुर झाले होते.पुन्हा शरीराला व्यायामाची सवय व्हावी यासाठी आयटी कंपनी कामगारांनसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेय.हे सामने दिवस रात्र,खेळविल्या गेले असून सर्व फुटबॉल खेळ हा इनडोर ग्राउंडवर झाला आहे,यात मुलींनी मोठा  सहभाग घेतला आहे. मुलांसोबत मुलींही मागे नाही हे यावरून सिद्ध होतं, तर प्रथमच फुटबॉल मॅच चा आनंद घेण्यासाठी नागरिक ही पुढे आले होते...

*विजेता संघ आणि खेळाडू* 

वयोगट - 14 

विजेता संघाचे नाव-यमुना XI

सर्वाधिक गोल-सुफियान शेख (5 गोल)

मोठा गट 

फुटबॉल विजेता संघ

अंडरडॉग्स

उपविजेता संघ - वाकड एफसी

उत्कृष्ट रनर - हर्षद राक्षे (स्कोर 6 गोल)

फुटबॉल स्पर्धेचं आयोजन,तुषार दुडंम आणि अभिषेक पांडे. यांनी उत्कृष्ट केलं तर पारितोषिक वितरण निलेश तरस,सोशीयल युथ फौंडेशन ने दिलंतसेच विशेष आभार Fc ,यमुना XI थेरगाव सोशल फाउंडेशन,यांनी प्रकट केले.

Post a Comment

Previous Post Next Post