मुंबई पोलिस फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊनच आता जबाब नोंदविनारप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी येथील पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदविण्यात येणार होता पण भाजपाने आंदोलनाची हाक दिल्यावर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन हा जबाब नोंदविण्याचे ठरविले आहे.नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप फडणवीसांवर ठेवण्यात येत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन टॅप केल्याचा हा आरोप आहे. या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यासंदर्भात जबाब नोंदविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना बोलावलं होतं. मात्र भाजपने बीकेसीकडे मोर्चा वळविण्याचे ठरविले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस त्यांच्या घरी जाऊनच आता जबाब नोंदवणार आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आता पोलिस जातील. सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मिळालेल्या नोटिशीबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि आपण पोलिस ठाण्यात जाऊ असेही सांगितले. तेव्हा भाजपाने बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची घोषणा केली. भाजपाची ही तयारी आणि त्यामुळे त्यांना वरचढ होण्याची संधी मिळेल हे हेरून महाविकास आघाडीने मागे पाऊल घेतले आणि फडणवीस यांच्या घरी जाऊनच जबाब नोंदविणार असल्याचे जाहीर केले, असे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post