पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांसह पुरूषां मध्ये झोंबाझोंबी केल्याची घटना घडली

सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रेस मीडिया लाईव्ह :

जळगाव :   पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांसह पुरूषां मध्ये झोंबाझोंबी केल्याची घटना दुपारी घडली. याप्रकरणी भारत नगरातील सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की , शहरातील भारत नगरमध्ये राहणाऱ्या काही महिला तक्रार देण्यासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बुधवार १६ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता आल्या. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाणे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल करुणासागर जाधव, राजकुमार चव्हाण, दिनेश कंखरे, महिला पोलीस कर्मचारी प्रियंका जोशी, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार चव्हाण, योगेश बोरसे, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री दुसाने हे सर्वजण शहर पोलीस ठाण्यात हजर होते.

महिलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार न देता आपापसात भांडण करून झोंबा झोबी केल्याचा प्रकार केला. यावेळी शहर पोलीसांनी धाव घेवून सुरू असलेले भांडण सोडविले. सर्वांना शहर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात बसविण्यात आले. याप्रकरणी महिला कॉन्स्टेबल धनश्री दुसाने यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्राची भागवत तायडे, भारती अनिल बडगे, गणेश अनिल बडगे, रमाबाई बळीराम भालेराव, समाधान बळीराम भालेराव, रवींद्र बळीराम भालेराव, सुनिता प्रभू सोनवणे सर्व रा. भारत नगर जळगाव यांच्या विरोधात भादवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post