इचलकरंजी नगरपरिषदेसमोर गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी नगरपरिषदेने त्रिसदस्यीस समिती निर्धारण दरानुसार लादलेल्या अन्यायकारक भाडे व अनामत रक्कम वाढीच्या विरोधात नगरपरिषद गाळेधारक समितीच्यावतीने आज गुरुवारपासून नगरपरिषदेच्या प्रवेशव्दारासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले.यावेळी उपोषणकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीच्या अनेक इमारती शहरातील विविध ठिकाणी असून त्या विविध व्यापारासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत.परंतू या इमारतींमधील गाळेधारकांना इचलकरंजी नगरपरिषद  प्रशासनाने त्रिसदस्यीय समितीची शिफारस व त्यास अनुसरून कौन्सिल ठरावानुसार मालमत्ता भाडेवाढीचा ठराव केला आहे. सदरचा ठराव हा अन्यायकारक व गाळेधारकांच्या व्यवसायाच्या मुळावर बेतणारा असल्याचा संबंधित गाळेधारकांच्या समितीचा आरोप आहे.तसेच या

समितीने नगरपरिषदेने भाडेवाढीच्या दिलेल्या नोटीसी विरोधात हरकत घेऊन जिल्हाधिका-यांना त्रुटी दाखवून फेर निर्धारण करावे, अशी मागणी केली होती.तसेच तत्कालीन खासदार राजू शेट्टी व गाळेधारक प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक झाली होती. तथापि फेरनिर्धारण न करता पुन्हा त्याच चुकीच्या निर्धारणाच्या आधारे भाडे वाढ व जप्तीच्या नोटीसा देवून नगरपरिषद प्रशासनाने गाळे जप्तीच्या कारवाया सुरु केल्या आहेत. सदरची कारवाई ही एकांगी व हुकूमशाही पद्धतीची असून लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचा आरोप इचलकरंजी नगरपरिषद गाळेधारक समितीने केला आहे.तसेच या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गाळेधारक हवालदील झाले आहेत. त्यांच्या व त्यांच्यावर आधारीत कुटूंब व नोकरवर्गाच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे इचलकरंजी नगरपरिषदेने त्रिसदस्यीस समिती निर्धारण दरानुसार लादलेल्या अन्यायकारक भाडे व अनामत रक्कम वाढीच्या विरोधात नगरपरिषद गाळेधारक समितीच्यावतीने आज गुरुवारपासून नगरपरिषदेच्या प्रवेशव्दारासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले.यावेळी उपोषणकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.यावेळी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत सर्व गाळेधारकांनी आपला व्यवसाय बंद ठेवून बेमुदत साखळी उपोषणात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.तसेच यावेळी गाळेधारक उपोषणकर्त्यांनी१ जानेवारी २०१८ पासून लागू केलेले भाडे हे अन्यायकारक असल्याने ते रद्द करून फेर मुल्यांकनानुसार नवीन भाडे १ एप्रिल २०२२ पासून आकारावे ,सध्या चालू असलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी ,सिल केलेले गाळे ताबडतोब उघडून व्यापा-यास व्यापार करण्यास परवानगी द्यावी , ३१ मार्च २०२२  रोजी अखेरचे थकीत भाडे नगरपरिषद कौन्सिल ठरावास अनुसरून जुन्याभाड्याच्या रक्कमेवर २५ टक्केप्रमाणे वाढीव भाडे भरून घ्यावे ,सर्व गाळ्यांना ९ वर्षे मुदतवाढ देवून त्याप्रमाणे नवीन भाडे करार करून द्यावेत ,अशा विविध मागण्या करतनगरपरिषद प्रशासनाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

या उपोषणात रणजीत आभाळे , ओमजी धुत, संजय कब्बुरे, श्रीकांत कलाल ,अमित बियाणी, बाळासाहेब पाटील, मनिष अग्रवाल, धर्मेश पवार, राजु चव्हाण स्वरूप कुडाळकर मनिष पमनानी, बाळासो देशमुख, मुबीन मोमीन, गोविंदराव टिळंगे ,रमेशभाई पंडया यांच्यासह अनेक गाळेधारकांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post