इचलकरंजीत नदीवेस रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा मोठा धोका



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरातील नदीवेस परिसरात मुख्य रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघाताचा मोठा धोका वाढला आहे.


त्यामुळे या रस्त्यावरील धोकादायकखड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.सदरचे निवेदन नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी स्वीकारले. यावेळी १० दिवसांत रस्ता दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 

इचलकरंजी शहरात नदीवेस नाका परिसरातील मुख्य रस्ता हा कर्नाटक राज्याला जोडणारा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावरून मालवाहतूक, ऊस वाहतूक यासह अवजड वाहनांची ये-जा होत असते. मात्र, अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने अपघाताची चिंता वाढली आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशा मागणीचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्याकडे सादर करण्यात आले.

तसेच १० दिवसांत सदरचा रस्ता दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बसगोंडा बिरादार, अभिषेक पाटील, हेमंत वणकुंद्रे, अण्णासाहेब शहापूरे,बाळासो पाटील, बाळगोंडा पाटील , विकास चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post