डीकेटीई मध्ये रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.इचलकरंजी आधार ब्लड बँक व मिरज एस.एस.आय ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इचलकरंजी शहरातील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.त्याच अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी डीकेटीईच्या दरबार हॉल येथे संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ पी.व्ही.कडोले यांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनीय करुन अभिवादन करण्यात आले.या वेळी नेहा जोशी विद्यार्थ्यीनीने प्रार्थना सादर केली.तसेच आधार ब्लड बँकचे सतीश मेटे, संजय टकले, डॉ. मधुकर जाधव, डॉ. बावणे आणि पोळ यांचा सत्कार डॉ. कडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर रक्तदान शिबीरास सुरवात करण्यात आली. अवघ्या साडेतीन तासात १७० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इचलकरंजी आधार ब्लड बँक व मिरज एस.एस.आय ब्लड बँक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणातरक्त संकलन करण्यात आले.सदर शिबिर यशस्वीरित्या यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. एस. जी. कानिटकर, डॉ. आर.डी. नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी सुमोद दानोळे, कृष्णा दायमा, मेधावी पाटील, श्रध्दा त्रिवेदी, विश्‍वजा खोळकुंबे, नम्रता जमदाडे, नविन शेटके, सौरभ खांडेकर , विजय कोळी यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post