पुणेकरांसाठी सरसकट हेल्मेट सक्ती नाही,.. पुणेकरांना दिलासा



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढून पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू केली होती. मात्र या बाबत सर्वस्तरातून या आदेशावर टीका झाल्यानंतर आज सकाळी आपल्या निर्यावरून त्यांनी घुमजाव केले आहे.या आदेशांवर स्पष्टीकरण देत पुणेकरांसाठी सरसकट हेल्मेट सक्ती नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.


ते म्हणाले, काल काढलेले आदेश हे आयुक्तांच्या परिपत्रकावरून काढण्यात आले आहेत. ही सरसकट हेल्मेट सक्ती नाही. मात्र दुचाकीवरील वाढते आपघात लक्षात घेता हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आम्ही सर्व शासकीय कार्यालये, शाळा आदी ठिकाणी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, काल संध्याकाळी (दि.31) जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्तीचा आदेश काढला होता. त्यानुसार पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा - कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू असणार आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढलेला आदेश -


Post a Comment

Previous Post Next Post