महिला दिनात समतेचा आशय गृहीत आहे......ऍड.दिलशाद मुजावर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.८ महात्मा जोतीराव फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना शिकवले म्हणूनच आज स्त्रीया शिक्षण घेत आहेत. महिलांच्या न्यायाने व सन्मानाने जगण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यांचे हे कार्य विसरून चालणार नाही. साधारण १११ वर्षे स्त्री स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु आहे. महिला दिन हा एक दिवसाचा नाही, तर रोज अमलात आणला पाहिजे.कारण त्यात समतेचा आशय गृहीत आहे असे मत ऍड.दिलशाद मुजावर  व्यक्त केले.त्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. हा कार्यक्रम श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय  , समाजवादी प्रबोधिनी आणि माजी विद्यार्थीनी संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या अयोजनामगिल हेतू स्पष्ट केला.

 

ऍड.दिलशाद मुजावर म्हणाल्या, समाजातील सरंजामशाही व दडपशाहीला विरोध करण्यासाठी ही संघर्ष चळवळ आहे. महिला आजही सुरक्षित आहेत का ? त्यांच्या जगण्याला बाळ मिळाले आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्यातील विषमतेची दरी कमी झाली पाहिजे. महिलांना संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला. महिलांनी मोबाइल वापरताना तांत्रिक माहिती घेऊन त्याचा वापर केला पाहिजे. कारण आज अनेक स्त्रीयाना फसविले जात आहे. स्त्री ही आर्थिकदृष्ट्या समक्ष असली पाहिजे . हे सर्व सांगत असताना त्यांनी समाजातील घडलेल्या घटनांची उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. व कायद्याने आपल्याला कशी सुरक्षितता दिलेली आहे तेही सांगितले.      

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, परंपरेने चालत आलेल्या आणि सध्याच्या नवंभांडवली व्यवस्थेत माणूस म्हणून जगण्यासाठीचा महिलांचा संघर्ष महत्वाचा आहे. समाजात भौतिक बदल झाले पण स्त्रीचे शोषण सुरूच आहे. माणूस म्हणून जगण्यात आपण सर्वजण कमी पडत आहोत, याचा परिणाम म्हणून माणूस  माणसापासून दूर जात आहे. तो अधिक हिंस्त्र होताना दिसत आहे. निसर्गाने स्त्री पुरुषांमध्ये अन्य बाबतीत भेद केला नाही तर आपण तो भेद वेगळ्याच पद्धतीने निर्माण केला आहे. शेतीचा शोध ही स्त्रीनेच लावला आहे.स्त्री ही नवनिर्मिती करण्यास सक्षम आहे.

       यावेळी माजी विद्यार्थिनी संघटनेने  महाविद्यालयाला एक संघणक संच भेट दिल्याचे दिला. तसेच मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी विद्यार्थिनीला दिला जाणारा ' कन्या - सुकन्या ' पुरस्कार कु. पल्लवी कोळी हिला प्रदान करण्यात आला.

स्मिता बुगडे , जान्हवी कोळी, स्नेहल पवार, पल्लवी कोळी, प्रियांका शिरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीत पाटील व डॉ. संपदा ठिपकूरळे यांनी मानले. कार्यक्रमास माजी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू - भगिनी , प्रशासकीय कर्मचारी व सेवक मोट्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. त्रिशाला कदम यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post