इचलकरंजी नगरपरिषदच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे 

इचलकरंजी ता.हातकणंगले येथे इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार दि.23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त शहरातील भगतसिंग उधान येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच शहीद भगतसिंह ,सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापूरे,उधान पर्यवेक्षक संपत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे,शितल पाटील, भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम, मनोज खंदारे, महेश बुचडे,सौ.कानडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post