देहूरोड शहराच्या बाजार पेठेत महान शहिदांना अभिवादन करून शाहिद दीन साजरा करण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख :

देहूरोड शहराच्या बाजार पेठेमधील इतिहासिक  सुभाष चंद्र बोस चौकात शाहिद दीन साजरा करण्यात आला.

भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा 'शहीद दिन' म्हणून मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

देहूरोड येथे सुभाष चौक याठिकाणी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करून सुभाष चंद्र बोस यांना पुष्पहार घालण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवडचे अबूबकर लांडगे समक्ष हजर होते.डाखोरे मामा, कांतीलाल सेठ, राजु व्यवहारे, मिक्की  कोचर, रेणू  रेड्डी, व इतर कार्यकर्ते , व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते. 


प्रेस मीडिया लाईव्ह

 ( सह संपादक अन्वरअली )

Post a Comment

Previous Post Next Post