राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार..?



प्रेस मीडिया लाईव्ह :

 बीडः राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार..? असा प्रश्न सर्वाँना पडला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या या पदासाठी बीडमधून रेखा फड आणि हेमा पिंपळे  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


या दोन्ही नेत्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रीय आहेत. आपापल्या स्तरावर पक्ष श्रेष्ठीकडे बातचीत सुरू झाली आहे. मराठवाड्याला अद्याप राज्यस्तरीय पद मिळालं नाही, त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठवाड्यात बीड जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राष्ट्रवादीला भरभरून देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते शरद पवार हे देखील सतत बीड जिल्ह्याचा दौरा करत असतात  त्यामुळे बीड जिल्ह्याची अपेक्षा वाढली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच आपला राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील आहेत. हे पद अर्धन्यायिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहू नये असा अलिखित नियम आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post