आमदार श्री मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्था तर्फे आयोजित माघी श्री गणेश जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार



प्रेस मीडिया ऑनलाइन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


 आमदार श्री मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेच्या हिंदुरक्षक मित्र मंडळ, नवीन शेवा* यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे माघी श्री गणेश जयंती निमित्त शुक्रवार दिनाकं 04 जानेवारी 2022 रोजी  नवीन शेव्यातील श्री शंकर  मंदिरात श्रीगणेशाचा महाभिषेक  व श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री बहिरीनाथ भजन मंडळ, बेलपाडा यांच्या सुमधूर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात *शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात  गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.  सदर वेळी मा *आमदार श्री मनोहरशेठ भोईर*  यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, माझ्या विचारांच्या आधारावर  आपल्या मंडळातर्फे सामाजिक व शैक्षणिक काम करत आहात, त्याचे मनापासून समाधान आहे व हे कार्य अखंडपणे चालू राहिले पाहिजे, तसेच आपल्या गावाच्या सार्वजनिक व सामाजिक कार्यात आपल्या मंडळाने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी असे अहवान केले. कार्यक्रमास  नवीन शेवा गावचे अध्यक्ष श्री कमलाकर पाटील उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मंडळाचे *माजी अध्यक्ष श्री गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष श्री दिनेश घरत* यांनी सूत्रसंचालन व आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *मंडळाचे माजी अध्यक्ष श्री दयालशेठ भोईर,* सेक्रेटरी श्री परशुराम ठाकूर, खजिनदार श्री प्रकाश म्हात्रे, माजी अध्यक्ष श्री पी डी घरत, श्री गणेश घरत, श्री जगजीवन भोईर, श्री शेखर पडते, श्री किसन म्हात्रे, श्री दत्ताराम घरत, श्री पंकज सुतार, श्री शैलेश भोईर, श्री प्रदीप घरत, श्री मोतीराम घरत, श्री उदय दरने, श्री केशव घरत, श्री सतीश भोईर, श्री संदीप घरत, श्री निवास पठारे, श्री मनोहर घरत, श्री सुरेश ठाकूर, श्री सज्जन ठाकूर, श्री मनोज म्हात्रे, श्री भुपेंद्र भोईर, श्री कुंदन भोईर, श्री जितेंद्र घरत, श्री किरण राणे, श्री महेंद्र भोईर व श्री हरेश्वर भोईर यांनी मेहनत  घेतली, या कार्यक्रमास  ग्रामस्थ व हिंदुरक्षक मित्र मंडळ आपल्या कुटूंबियासह उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post