इचलकरंजी लायन्स क्लब तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर दर्शन यात्रा

 अनोख्या उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक..


प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या ५५ सदस्यांना मोफत पंढरपूर दर्शन यात्रा घडवून आणण्यात आली.या यात्रेचा संपूर्ण खर्च लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांच्या कुटूंबाने उचलला. त्यामुळे धार्मिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देवून राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.



इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर ,झाडांचे रोपन ,शाळांना मुलभूत सुविधा पुरवणे ,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण ,आपत्ती काळात गरजूंना विविध स्वरुपात मदत ,शासनाच्या विविध योजनांसाठी सहकार्य आणि प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.याच अनुषंगाने लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांच्या नेतृत्वाखाली विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या ५५ सदस्यांना मोफत पंढरपूर दर्शन यात्रा घडवून आणण्यात आली.यावेळी यात्रेकरुंचा प्रवास खर्च ,जेवण असा संपूर्ण खर्च लक्ष्मीकांत भट्टड यांच्या कुटूंबाने उचलला.तर यात्रे करुंची चहा - नाष्ट्याची सोय लायन्स क्लबचे सेक्रेटरी शैलेंद्र जैन आणि ट्रेझरर महेंद्र बालर यांनी उपलब्ध करुन दिली.या यात्रेचा शुभारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड, ट्रेझरर महेंद्र बालर, सेक्रेटरी शैलेंद्र जैन ,विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजाराम बोंगार्डे ,कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल सुर्वे ,प्रतिष्ठित नागरिक गंगाराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी

अमित पोतदार, अरुण पाटील, कनक भट्टड, कांता बालर ,विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष विष्णुपंत नेतले महाराज , धनपाल सुतार ,खजिनदार लक्ष्मण मद्यापगोळ , सेक्रेटरी नेताजी मोरे ,जाँईंट सेक्रेटरी .नारायण कबाडे ,संचालक शंकर कांबळे ,अजमुद्दीन मुल्ला ,गिरीधारी लोहिया ,शामराव रोकडे ,रामचंद्र बोंगाळे ,अल्लाउद्दीन मुजावर ,प्रभाकर डोईफोडे ,बाबुराव यांच्यासह लायन्स क्लबचेसदस्य ,विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य व नागरिकउपस्थित होते. 

दरम्यान ,धार्मिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देवून राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post