डॉ तुषार निकाळजे यांना अष्टपैलू कामगिरी पुरस्कार २०२२ ने सन्मानित



प्रेस मीडिया ऑनलाइन : 

नवी दिल्ली:- वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड, नवी दिल्ली यांनी डॉ. तुषार निकाळजे यांना "अष्टपैलू कामगिरी पुरस्कार २०२२"ने  सन्मानित केले आहे .डॉ.तुषार निकाळजे यांना आजपर्यंत वेगवेगळे १३  पुरस्कार मिळाले आहेत .त्यामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे .डॉ.तुषार निकाळजे यांच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. जीवनगौरव, संशोधनात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व, युनिक व्यक्तिमत्व, निवडणूक निष्णात व्यक्ती,प्रतिष्ठित प्राध्यापक इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.

डॉ. निकाळजे यांनी दृष्टीहीन व्यक्तींकरीता  लिहिलेल्या व प्रकाशित केलेल्या 'अंडरस्टँडिंग  द युनिव्हर्सिटी'' या ब्रेल इंग्रजी पुस्तकास नुकताच गोल्डन बुक पुरस्कार मिळाला आहे. सलग दीडशे तास आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. निकाळजे यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. कोविड  कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर गरजूंना समुपदेशन करण्यात सहभाग घेतला होता. काही गरजूंना त्यांनी प्रेस मीडिया वृत्तसंस्थेने मार्फत आर्थिक सहाय्य देखील केले होते. प्रेस मिडिया या वृत्तसंस्थेने डॉ. निकाळजे यांना कालावधीतील सेवेबद्दल गौरवपत्र देऊन सन्मानित केले आहे .राजस्थान मधील फोरेवर स्टार इंडिया या संस्थेने प्रशासनातील सुपरहिरो पुरस्काराने सन्मानित केले आहे .डॉ.तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे शिक्षकेतर -कर्मचारी म्हणून गेले ३१ वर्षे काम करीत आहेत .प्रशासकीय काम करीत असताना शिक्षण, संशोधन, पुस्तक लेखन ,प्रकाशन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ,कोविड काळातील समुपदेशन, लेख इत्यादी विषयांत अष्टपैलू कामगिरी केली आहे .या सर्व अष्टपैलू कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड, नवी दिल्ली यांनी घेतली आहे व डॉ.निकाळजे यांना "अष्टपैलू कामगिरी पुरस्कार २०२२ " ने सन्मानित केले आहे. या प्रसंगी बोलताना डॉ .तुषार निकाळजे म्हणाले, "आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी मला हा पुरस्कार जाहीर झाला, हा चांगला योगायोग आहे .कारण आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७३  वा वर्धापन दिन आहे .माझ्यासारखा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणे म्हणजे दुधात साखरच आहे .मी आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड करिता प्रयत्न करणार आहे".

Post a Comment

Previous Post Next Post