टीईटी घोटाळ्यात तीनशे बनावट प्रमाणपत्र जप्त

 पैसे देऊन पास झालेल्या 7500 बहुत शिक्षकावर कारवाई सुरू


सुनील पाटील

शिक्षक भरती टीईटी घोटाळ्यात आत्तापर्यंत तीनशे बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहे शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टाने पाठवलेले 300 बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहे

शिक्षक भरती (टीईटी) घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा झाला असल्याच बाब उघड झाल्यानंतर किती जणांना पैसे देऊन पात्र करण्यात आलं, याची आकडेवारीदेखील समोर आली. अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळं सर्वंत्र खळबळ माजली होती. आता या 7 हजार 800 बोगस शिक्षकांवर कारवाई सुरु झाली आहे. नाव, पत्त्यासह सर्व यादीच शिक्षण खात्याने पोलिसांनी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post