हे काम जो मार्गी लावेल तो आमचा प्रभाग क्रमांक 24 चा हिरो ठरणार ..
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड विकास नगर किवळे प्रभाग क्रमांक 24 हद्दीतील मुंबई बेंगलोर बायपास महामार्ग ओम पॅराडाईस सोसायटी च्या समोर सर्व्हिस रोडवर कित्येक महिन्यापासून ड्रेनेज फुटलेल्या अवस्थेत आहे, त्या मुळे ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डा पडलेला आहे. काही वेळा त्या साचलेल्या घाण पाण्यावरून सांभाळून जाण्यासाठी दुचाकीस्वार यांचाअपघात होतात . स्थानिक नागरिक या मुळे त्रस्त झालेले आहेत. या बाबत एका स्थानिक नागरिकानी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले वारंवार तक्रार देऊनही अद्याप या ठिकाणी कोणतीही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही, परंतु प्रश्न असा निर्माण होत आहे की ड्रेनेजच काम कोण करणार ?
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 24 मध्ये या प्रकारे नागरिकांना त्रास होत आहे. दुचाकीस्वार वेगाने जात असताना तेथून पायदळी जाणाऱ्या व्यक्तींवर, शाळकरी मुलांवर पाणी उडण्याचे प्रकार होत आहे. एका नागरिकाने सांगितले की जो हे काम जो मार्गी लावेल तो आमचा प्रभाग क्रमांक 24 चा सध्या हिरो ठरणार आहे.