अजय तायडे म्हणजेच विकास पुरुष ही पदवी नागरिकांनी त्यांना दिली
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी (मुन्ना) शेख :
अजय मगनलाल तायडे यांनी 2007 साली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून राजकारणात पदार्पण केले.आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यानंतर 2012 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवून प्रथमच नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी झोपडपट्टी भागांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली, जेव्हा सावित्री नदी वरील पुल कोसळण्याची दुर्घटना झाली त्यावेळी असल्या दुर्घटना आपल्या पुणे शहरात घडू नये म्हणून पाठपुरावा करत पुणे शहरातील सर्व पूलांचे नव्याने ऑडिट करून घेतले.
तसेच पुणे शहरातील डेंगळे पूल बांधला भविष्याचा विचार करत रुंद व मजबूत पूल बांधण्यात आलेला आहे, या पूलाचे नामकरण छत्रपती शाहू महाराज सेतू असे देण्यात आले आहे.
नदीजवळील पूर भागामध्ये मंगळवार पेठेतील जुना बाजार येथील राहणाऱ्या गोरगरीब लोकांना पक्की घरे बी. एस. यूपी अंतर्गत मिळउन दिली. तसेच कमला नेहरू हॉस्पिटल त्यांच्या प्रभागात असल्यामुळे अनेक नागरिक पुणे व शहरातील आणि महाराष्ट्रभर नागरिक या ठिकाणी येऊन आरोग्याचे लाभ घेत आहे. आरोग्याबाबतचे अडीअडचणी व प्रश्न त्यांच्यासमोर मांडतात आणि तेही नागरिकांना प्रतिसाद देत भरपूर धावपळ करतात. या भागातील अनेक नागरिकांनी यांच्याकडे तक्रार केली हृदय विकाराचा त्रास शहरातील भरपूर लोकांना आहे. हे समजल्यावर कमला नेहरू आरोग्य विभागातील अधिकारी वशिष्ठ मंडळ यांच्याशी संपर्क साधत टी. एच .एस. वेलनेस. प्रायव्हेट लिमिटेड पुणे व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प उभा करायचे ठरवले या सेंटरमध्ये हृदय विकाराच्या सर्व व्याधींवर उपचार करण्याचे ठरवले,
या योजनेचा फायदा पुणे महानगरपालिका मध्ये राहणाऱ्या आणि शहराबाहेरच्या प्रत्येक नागरिकाला होत आहे. हृदयविकारा संबंधित आजारावर सर्व उपचार 50% सवलत दरामध्ये केले जात आहे, असे फलक त्या ठिकाणी लावण्यात आले आहे,
प्रभागांमध्ये अजय तायडे गोरगरिबांसाठी धावून येणारा आपल्या हक्काचा नगरसेवक अशी ख्याती त्यांची निर्माण झालेली आहे. आणि हे त्यांनी 2017 साली अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढउन सिद्ध केले .आणि भरघोस मते मिळवली तरी सुद्धा त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. परंतु अजय तायडे पराभवाला न जुमानता त्यांनी गोरगरीब जनतेसाठी आहो दिवस-रात्र परिश्रम घेतले, आणि महत्त्वाचे कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका घेत 2017 साली टी .एच. एस.वेलनेस. प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे महानगरपालिका आरोग्य प्रकल्प राबविण्यासाठी स्वतः धावपळ करत होते .
आणि हे सर्व प्रभागातील जनतेने साक्षात आपल्या डोळ्याने पाहिलेले आहे. मंगळवार पेठ त्यांच्या 19 प्रभागांमध्ये अजय तायडे म्हणजेच विकास पुरुष ही पदवी नागरिकांनी त्यांना दिली आहे,
कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये या आरोग्य प्रकल्पामध्ये हृदय विकाराच्या आजारावर योजनेचा फायदा एक लाखाच्या वर नागरीकांनी घेतलेला आहे.
19 प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते नेहमी चर्चा रंगत असते अजय तायडे हे आरोग्याच्या दृष्टीने प्रभागासाठी व पुणे शहरासाठी वरदानच ठरले आहे.