मंत्री नवाब मलिक यांच्या तीन मागण्या कोर्टाने मान्य केल्या.

नवाब मलिका यांचा राजीनामा घेणार नाही.. शरद पवार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली नवाब मलिकांना  ईडीने बुधवारी सकाळी सात वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं होतं. त्यानंतर त्यांना दुपारी ताब्यात घेण्यात आले  त्यानंतर त्यांना कोर्टात सुनावणी चालू झाली. या सुनावणी मध्ये मंत्री नवाब मलिक यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली.

ईडीच्या कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे  काही मागण्या केल्या होत्या. या मधील 3 मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, ईडीच्या कोठडीत त्यांना घरचे जेवण देण्यात यावं. तर दुसरी मागणी, तपासा वेळी त्यांच्या वकिलांना तेथे उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि तिसरी म्हणजे मलिकांना औषधांसाठी परवानगी मिळावी. या तिन्ही मागण्या कोर्टाने मान्य केल्या आहेत.

नवाब मलिकांना  अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले.त्या सोबतच काल पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post