मराठा सेवा संघ सांगली जिल्हाध्यक्षपदी अभियंता सचिन पवार तर कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. संजय पाटील यांची निवड

मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी केल्या निवडी जाहीर


प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज प्रतिनिधी  : धनंजय हलकर (शिंदे)

मराठा सेवा संघाची सांगली जिल्हाध्यक्षपदी जल संपदा विभागातील अभियंता सचिन पवार यांची तर कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. संजय पाटील यांची निवड करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्था (मराठा उद्योजक कक्ष) प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. 

गेल्या काही वर्षांपासून मराठा सेवा संघाची सांगली जिल्हा कार्यकारणी रिक्त होती. संघाचे संस्थापक पुरषोत्तम खेडेकर व केंद्रीय कार्यकारणी यांनी कार्यकारिणीची यादी बंद लिफाप्यातून पाठविली होती. रविवारी मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बैठकीत राजेंद्रसिंह पाटील यांनी सर्वांसमोर लिफाफा उघडून सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अभियंता सचिन पवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन चव्हान, कोषाध्यक्षपदी  जल संपदा विभागातील जालींदर महाडीक, जिल्हा सचीवपदी  अमृतराव सुर्यवंशी यांची निवड जाहीर करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीत एकूण २६ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हि जबाबदारी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सर्वाना निवडीची प्रदान करण्यात आली. तर सांगली व कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांची निवड जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

राजेंद्रसिंह पाटील यांनी सेवा संघाच्या अजेंड्यानुसार पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे अशी सूचना केली. सचिन पवार यांनी उर्वरित पदे निवडून कार्यरणी परिपूर्ण केली जाईल. तसेच संघाचे काम राज्यात आदर्शवत असे करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या नेतृत्वाखी एकमुखाने कार्यरत राहून पुरुषोत्तम खेडेकर यांचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची ग्वाही दिली. 

संघाचे माजी सचिव शाहीर पाटील, कृषिधिकारी प्रतापसिंह मोहिते, संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, संघाचे माजी सचिव संजय कदम यांनी मनोगते व्यक्त केली. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी आभार मानले. 

यावेळी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, बाळासाहेब लिपाले-पाटील, प्रशांत भोसले, युवराज शिंदे, उद्योजक कक्षाच्या विभागीय अध्यक्षा आशा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्ष शितल मोरे, रुपाली पाटील, राहुल पाटील, सुहास पवार, उदय निकम यांच्यासह विविध कक्षांचे  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post