क्राईम न्यूज : दोन हजारची लाच मागितल्या प्रकरणी

पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई    व पोलीस पाटील जगदीश भूपाल यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  कोर्ट वॉरंट मध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजारची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा.यड्राव) व पोलीस पाटील जगदीश भूपाल संकपाळ (रा. यड्राव, ता. शिरोळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कॉन्स्टेबल सिराज भाई पसार झाला असून, पोलीस पाटील संकपाळ याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आलीय.


पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि पथकाने ही कारवाई केली. गेल्या एक महिन्यात कोल्हापूर पोलिस दलातील चार पोलीस तीन ट्रॅप मध्ये सापडले आहेत. आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील विजय कारंडे आणि किरण गावडे हे दोघे दहा लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले होते. आता त्यापाठोपाठ शहापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, यड्राव परिसरातील तक्रारदार व्यक्तीच्या आत्तीच्या नावे कोर्टाचे वॉरंट निघाले होते. याप्रकरणात संबंधित महिलेवर अटकेची कारवाई शक्य होती. मात्र, ही कारवाई टाळण्यासाठी आणि तपासात मदत करण्याचे आमिष दाखवून, कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश संकपाळ यांनी तक्रारदार व्यक्तीकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोड अंती पंधराशे रुपयांवर सौदा ठरला होता. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज सकाळी संबंधित संबंधित व्यक्तीकडून रक्कम स्वीकारताना पथकाने पोलीस पाटील संकपाळ याला ताब्यात घेतल्याचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी पत्रकारांना सांगितले. कॉन्स्टेबल सिराजभाई पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post