बंडातात्या कराडकर स्त्रियांच्या आयुष्य वर बोलणं चुकीचं

  ही मानसिकता बदलावी लागेल अमृता फडणवीस यांची बंडातात्या वर टीका..


प्रेस मीडीया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधान आवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे 


स्त्रियांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. ही मानसिकता अशी बदलावी लागेल, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी बंडातात्यांवर टीका केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.

मला वाटतं स्त्रियांनी आपल्या देशात अधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात नेहमी हेच होतं. कोणी काही बोललं की त्यावर आपण आंदोलन करतो. पण या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. आपणच ठरवलं पाहिजे काय बोलावं आणि काय बोलू नये. स्त्रियांच्यांवर अत्याचार होतात तेव्हाच आपण बोलतो किंवा कारवाई करतो. पण आता आपल्याला आपल्या मानसिकतेत रिव्हॉल्यूशनरी चेंज आणावा लागेल, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

पर्सनल कमेंट नको....

खासगी आयुष्य आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. पर्सनल कमेंट करू नये. एखाद्या नेत्याने पत्नीला पार्टनर केलं, तिला काही कंपनीत रोल दिला. तिथे जर घोटाळा झाला तर त्याबाबतही सावध भूमिका असायला हवी, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.

अवगुण सुधारा....

महाआघाडीतील स्त्रियांवर काही अन्याय झाला तर महिला आयोगाकडून तात्काळ दखल घेतली जाते. पण भाजपशी संबंधित महिलेबाबत काही झालं तर त्याची दखल घेतली जात नाही, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे, असा सवाल पत्रकारांनी अमृता यांना केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महावसुली सरकारची कामे तशीच चालू आहेत. हे बायस सरकार आहे. या सरकारमध्ये एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय दिला जातो. खरं तर हे सरकारमधील अवगुण आहेत. त्यांनी ते सुधारावेत, असा टोला त्यांनी लगावला.

संघ-भाजप पुरोगामी....

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पुरोगामी असल्याचा दावा केला. भाजप-संघ पुरोगामी आहेत. ते स्त्रियांचा मान ठेवतात. मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांचा जर कोणी सर्वाधिक आदर देत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा दावाही त्यांनी केला.

फडणवीसांची बायको हे विसरून जा....

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post