कर्जत येथे कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांची ११८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

नरेश कोळंबे :  कर्जत 

 कर्जत येथील स्वातंत्र्य सेनानी , कुलाबा जिल्ह्याचे खासदार स्वातंत्र्यपूर्वी चे कर्जत चे आमदार कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांची ११८ वी जयंती आज स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चौक कर्जत येथे स्वराज्य सामाजिक संस्था कर्जत यांच्या वतीने साजरी करण्यात आली. 

 यावेळी कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांचा पणतू रोहनजी राऊत यांच्या हस्ते चौकाचे पूजन केले गेले . डॉ रमेश पोवार यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तर माजी विस्तार अधिकारी जी एस म्हात्रे यांनी भाऊसाहेब राऊत , स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  भगवान धुळे यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

गुजरात येथील एस कांत कंपनीचे मॅनेजर महेश हरिश्चंद्र कोळंबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली.या प्रसंगी भाऊसाहेब राऊत यांचे पणतू रोहन राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

    कर्जत मधील इतिहास संशोधक मा वसंत कोळंबे यांनी कर्मवीर भाऊसाहेब राऊत यांच्या बद्दल माहिती दिली.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय कोंडीलकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संतोष कोळंबे यांनी केले.या कार्यक्रमा ला स्वराज्य सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सविता कोळंबे, सचिव रोहिदास लोभी, राजेन्द्र  आढाव सर, अधिकारी सर, हावरे सर, जगदीश जाधव सर, टी आर पाटील सर, श्रीकांत आगीवले सर, महेश कोळंबे, दत्ता कोळंबे, डॉ पवार, सिद्धार्थ ढोले, पत्रकार बाळू गुरव , विशाल माळी, रघुनाथ विभार, रेश्मा ताई ठोंबरे, आगीवले ताई, पालांडे साहेब, साईनाथ श्रीखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post