इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन




प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी : आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी   इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्यदैवत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज याच्या अश्वारुढ पुतळ्यास तसेच छ.शिवाजी महाराज उद्यान येथील अर्धपुतळ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा फलकास  प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणेत आला.

         याप्रसंगी उप विभागीय अधिकारी डॉ. विकास खरात,अप्पर तहसिलदार शरद पाटील,शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुंडलीक जाधव, महाजन गुरुजी, माजी बांधकाम सभापती  उदयसिंग पाटील, माजीशिक्षण सभापती मनोज साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता संजय बागडे , भागवत सांगोलकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, जल अभियंता सुभाष देशपांडे,सदाशिव  शिंदे,जनसंपर्क अधिकारी  नितिन बनगे, शितल पाटील, उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, सर्जेराव पाटील,संजय कांबळे, राजश्री कोरगांवकर , भारत कोपार्डे,सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम, महेश बुचडे,जालंधर कोरे, यांचेसह नगरपरिषद अधिकारी कर्मचारी आणि बालवाडी विभागा कडील शिक्षिका उपस्थित होत्या.


          

    

Post a Comment

Previous Post Next Post