सर्वत्र गाजत असलेल्या ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी जाणून घ्या…

 


प्रेस मीडिया :

सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात होत आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा कदाचित हा चित्रपट तुम्ही पाहिला देखील असेल.या चित्रपटांमध्ये लाल चंदनाच्या  तस्करी बद्दल सांगण्यात आलेले आहे. व या चित्रपटाची सारी कथा या लाल चंदनाच्या अनुषंगानेच चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटांमध्ये घडणाऱ्या घटना या जंगलाच्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. या चित्रपटामध्ये चंदनाची तस्करी कशी केली जाते तसेच तस्करी करताना कोणकोणत्या शकली लढवल्या जातात याबद्दलची अनेक दृश्य आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. 


लाल चंदनाची तस्करी केल्यानंतर लाल चंदन(Red Sandalwood Story) बाजारामध्ये कसे विकले जाते व त्याची बोली कशी लावली जाते.. अशा अनेक घटना आपल्याला या चित्रपटामध्ये एकामागोमाग एक दाखवण्यात आलेल्या आहे. हा चित्रपट अनेक वेगवेगळ्या स्टोरी, ॲक्शन या सर्वांचा पूर्णपणे मिलाप आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला या जंगलातील माहिती आहे का जी तुम्ही चित्रपटामध्ये सुद्धा पाहिली नसेल.? या जंगलाबद्दल अश्या अनेक काही गोष्टी आहेत जे तुम्हाला थक्क करणाऱ्या आहेत.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या जंगलाबद्दल एक विशेष महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आणि लाल चंदना मध्ये असे नेमके काय महत्वाचे असते ज्यामुळे या चंदनाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. चंदन इतके विशेष आहे व महाग आहे की या चंदनाच्या सुरक्षा साठी जंगलामध्ये अनेक कमांडो तैनात करण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या जंगलाशी संबंधित असलेली एक महत्त्वाची गोष्ट…हे लाल चंदन सध्या दुर्लभ झाल्याच्या कारणामुळे तस्करी होणाऱ्या जंगलावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. 

हे चंदन बाहेर विकल्याने तस्करांना खूप फायदा मिळतो. खरे तर आता या झाडांची कटाई करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच हे चंदन आंध्र प्रदेशच्या बाहेर घेऊन जाण्यास बेकायदेशीर सुद्धा मानण्यात आले आहे. या लाल चंदनाचे वैज्ञानिक नाव Pterocarpus santalinus असे आहे. असे म्हटले सुद्धा जात आहे की, या चंदनाच्या झाडांची सुरक्षा करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स चे जवान तैनात करण्यात आलेले आहे कारण की या जंगलांमध्ये लाल चंदनाची असणारी झाडे 50 टक्के पेक्षा जास्त कमी झालेली आहेत आणि ही तस्करी रोखण्यासाठी हा सगळा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

इंडिया टुडे मॅगझिन मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी लाल चंदनाद्वारे अंदाजे 1,200 % लाभ मिळत असल्याने काही तस्कर आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक वर्षी 2,000 टन लाल चंदन चेन्नई, मुंबई,तूतीकोरिन आणि कोलकाता बंदर द्वारे नेपाळ किंवा तिबेटच्या रस्त्याने प्रमुख बाजार चीन पर्यंत पोहचवत असे. ही तस्कर मंडळी चंदन वेगवेगळ्या शकली लावून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असे तसे की एसबेस्टसची चादर, नारळाच्या झावळ्या , मिठामध्ये लपवून चंदन नेले जात असे. वर्ष 2015 मध्ये ही तस्करी थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चकमक झाली होती आणि यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले परंतु आता जर या चंदनाची तस्करी करताना एखादी व्यक्ती सापडली तर त्या व्यक्तीस अकरा वर्षाचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

लाल चंदनाचे फर्निचर सजावटीचे सामान, पारंपारिक वाद्य, यंत्र याकरिता मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याशिवाय हिंदू देवी-देवतांचे मुर्त्या, फोटो फ्रेम आणि घरामध्ये आवश्यक असणारे डब्बे बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. जापान मध्ये विशेष वाद्ययंत्र बनवण्यासाठी या वाद्याला चंदनाच्या लाकडाचा विशेष मागणी असते. असे सांगितले जाते की, औषधे, अत्तर,फेशियल क्रीम सुगंध आणि कामोत्तेजक औषधे बनवण्यासाठी सुद्धा या चंदनाचा वापर केला जातो.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चंदनाच्या लाकडाची किंमत खूपच जास्त असते सोबतच जपान, सिंगापूर ,यूएई, ऑस्ट्रेलिया सोबतच अन्य देशांमध्ये या लाकडाना खूपच मागणी असते परंतु सर्वात जास्त चीन या देशांमध्ये या लाल चंदनाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.सत्याग्रहाच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की,जपानमधील पारंपारिक वाद्य यंत्र शामीसेन. भारतातून लाल चंदनाची आयात केली जाते.असे म्हटले जाते की, प्रत्येक वर्षी अनेक लाल चंदन सुद्धा वाद्य यंत्र बनवण्यासाठी वापरण्यात येते. तसेच लग्नाच्या वेळी हे चंदन देण्याची परंपरा तिथे आहे. 

या चंदनाद्वारे बनवलेले फर्निचर सुद्धा खूपच महागडे असते आणि म्हणूनच अनेकदा एक स्टेटस सिम्बॉल म्हणून या फर्निचरकडे पाहिले जाते.असे म्हटले जाते की, न्युक्लिअर रिॲक्टर द्वारे प्रसारित होणारे जे काही विकिरण असतात ते थांबवण्यासाठी सुद्धा लाल चंदन खूपच फायदेशीर ठरते. जपानी वाद्य बनवण्यासाठी देखील लाल चंदनाचे लाकूड सर्वात जास्त चांगले मानले जातात या चित्रपटांमध्ये या गोष्टीचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post