प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची मजरेवाडी आणि कट्टी मोळा पाणी उपसा केंद्रास भेट



प्रेस मीडिया :

  इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा विविध कारणांमुळे अनेक वेळा अनियमित होत असल्याने याबाबत शहरातील  मान्यवर तसेच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने मंगळवार दि.१८ जानेवारी रोजी प्रशासक तथा  मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इचलकरंजी शहरास पाणी


पुरवठा करणाऱ्या मजरेवाडी उपसा केंद्र, पंचगंगा जॅकवेल तसेच नव्याने सुरू होत असलेल्या कट्टी मोळा पाणी उपसा केंद्रास संबंधित अधिकारी आणि मक्तेदार यांचे समवेत भेट देऊन पाहणी केली.त्याच बरोबर शहराचा पाणी पुरवठा अखंडित राहील याची पुर्णपणे दक्षता घेणेच्या सुचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावेळी जल अभियंता सुभाष देशपांडे, अभियंता बाजीराव कांबळे, योजनेचे मक्तेदार मौला बागवान आणि तुषार उनाळे उपस्थित होते.


  

Post a Comment

Previous Post Next Post