पालकमंत्री आदितीताई तटकरे व शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते द्रोणागिरी महोत्सवाचे उदघाटन.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या बिगर राजकीय सामाजिक कला क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या संस्थे तर्फे जिल्हा स्तरीय 21 वा युवा महोत्सव दि 2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन एम एस ई झेड (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर,बोकडवीरा, तालुका उरण येथे मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना विषयक सर्व नियम व अटींचे पालन करत सोशल फिजिकलं डिस्टन्स पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून नियमांच्या अधीन राहून संपन्न होणार असून विविध देशी विदेशी असे 132 हुन अधिक स्पर्धांचा या म्होत्सवात समावेश आहे. दिनांक 2/1/2022 रोजी या स्पर्धेचे उदघाटन रायगड *जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे व माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या शुभहस्ते झाले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, काँगेसचे सक्रिय पदाधिकारी डॉ मनीष पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत तसेच  दिग्गज नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध व्यक्ती, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post