१९८७ पासून प्रलंबित असलेले आंबील ओढा सरळीकरण पूर्ण करा

 झोपडपट्टी पुनर्वसनाच्या आड येऊ नका : आंबील ओढा रहिवासी संघाची भूमिका


प्रेस मीडिया ऑनलाइन :

पुणे : १९८७ पासून विकास आराखड्यात असलेली  आंबील ओढा सरळीकरणाची  प्रलंबित योजना महापालिकेने पूर्ण करावी ,पुरापासून सुटका करावी ,रहिवाशांच्या  सुरू असलेल्या  झोपडपट्टी पुनर्वसनाच्या आड कोणीही येऊ नये  अशी भूमिका नियोजित आंबील​ ​ओढा वसाहत रहिवासी संघाने आज पत्रकाद्वारे मांडली आहे . नियोजित आंबील​ ​ओढा वसाहत रहिवासी संघाचे प्रतिनिधी  सचिन निवंगुणे, ​ ​सचिन दिघे​,बाळासाहेब चव्हाण ,तानाजी लोहोकरे ,मुक्ता माने​,लक्ष्मी पवार    यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही भूमिका मांडण्यात आली आहे . 

​१९८७ पासून प्रलंबित सरळीकरण

​आंबील ओढा वसाहतीमधील साधारण 800 झोपड्या पुनर्वसन प्रकल्पात आहेत. ही घोषित झोपडपट्टी आहे . ओढ्याच्या सरळीकरणाचे काम न झाल्याने इमारतींचे बांधकाम देखील सुरु  झालेले नाही . रहिवाशांना  सध्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहावे लागत आहे. ही पुनर्वसन योजना  पूर्ण लवकर झाली नाही तर या झोपडपट्टीवासीयांचे स्वतःच्या घरी राहण्याचे स्वप्न लांबणार आहे. झोपडपट्टीतील आधीची घरे अनधिकृत होती, परंतु पुनर्वसन योजनेतून मिळणारी घरे अधिकृत असणार  आहेत. त्यामुळे आमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोर्टाने झोपडपट्टी पाडणे आणि पुनर्वसन प्रक्रियेवरील स्थगिती ऑगस्ट २०२० मध्येच उठवली आहे . महानगरपालिका, राज्य शासन आणि एस आर ए मान्यताप्राप्त प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ओढ्याचे सरळीकरण आवश्यक आहे. त्या आड कोणीही येऊ नये . ओढ्याचे  सरळीकरण हा विषय १९८७ च्या  डीपी मध्ये ,विकास आराखड्यामध्ये मांडला गेलेला आहे . १९८९  आणि 2017 विकास आराखडा मध्ये देखील सरळीकरण प्रस्तावित केलेले असताना त्याला आजच विरोध करणे यामागे अन्य हेतू असण्याची शक्यता जास्त आहे,असे पत्रकात म्हटले आहे .हे सरळीकरण प्रस्तावित केल्यापासून आजतागायत 4 वेळा पूर आलेला आहे .तेव्हा जे कोणी मदतीला देखील  आलेले नव्हते,तेच आता सरळीकरणाला  विरोध करीत आहेत .   

या झोपडपट्टी पुनर्वसनाची संकल्पना  1989 साली टाऊन प्लॅनिंग स्कीम मध्ये प्रस्तावित केलेली आहे. संभाव्य हाय स्पीड  मास ट्रान्झिट  ​मार्ग ​या भागातून  सरळ मार्गाने जाणार असल्याने ओढ्याचे सगळीकरण भावी काळात देखील उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सरळीकरण हा विषय विनाकारण वादग्रस्त करू नये, अशी रहिवाशांची भूमिका आहे.प्रशासकीय आणि सामाजिक बाजूही समजून घेतली पाहिजे,असे रहिवाशांनी म्हटले आहे .   

​आमची भूमिकाही समजून घ्या :रहिवासी संघ

​पुनर्वसनाच्या शासकीय आदेशाने आम्ही आमच्या राहत्या जागा सोडलेल्या आहेत. तेथे सपाटीकरण पूर्ण होत आलेले आहे आणि बांधकाम सुरु होण्याच्या स्थितीमध्ये आहे. ओढ्याचे सरळीकरण करण्याचे कंत्राट देखील पालिकेने दिलेले आहे. अशा वेळी सरळीकरणवर प्रश्नचिन्ह उमटवणे योग्य ठरणार नाही. यासंबंधात माध्यमांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महापालिका, राज्य शासन , स्थानिक नगरसेवक, रहिवाशांच्या भूमिका देखील समजावून घेतल्या पाहिजेत, असे आवाहन रहिवासी संघाने केले आहे


*प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी* :सरळीकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित  माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ..

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर 98 230 736 27 

प्रशांत वाघमारे, शहर अभियंता 96 89 93 13 11

 मनपा आयुक्त विक्रम कुमार 900 403 30 33 

सचिन निवंगुणे  ,नियोजित ​आंबील ओढा वसाहत रहिवासी संघ ​9175707337,​97 6308 2353


सचिन दिघे : ,नियोजित आंबील ओढा वसाहत रहिवासी संघ :9763458887


​स्थानिक नगरसेवक :धीरज घाटे -9822871530



Post a Comment

Previous Post Next Post