रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनी ॲप वर( दुचाकी टॅक्सी ) रोखण्यासाठी विशेष भरारी पथक मूग गिळून गप्प

या बाबत पोलिस यंत्रणा सुद्धा गप्प 


प्रेस मीडिया :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

  पुणे : शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष- रिक्षाचालकांनी वारंवार मागण्या करुनही शासन-प्रशासनाचे  पुर्ण दुर्लक्ष करीत आहे  या उलट दुचाकी प्रवासी वाहतूक बेकायदेशीर असताना सुद्धा पुणे पिंपरी चिंचवड मध्ये बिनधास्त पणे  प्रवासी वाहतूक ॲप कंपनी वाल्यांचा सुळसुळाट झाला आहे  या बाबत  पोलिस यंत्रणा गप्प आहे .  

दुचाकी टॅक्सी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे परिणामी रिक्षा चालकां मध्ये प्रवाशी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे  . सन्मानाने व्यवसाय करुन पोट भरण्याचे दिवस आता संपुष्टात येऊ लागल्याने भविष्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवसभर पाच-दहा रुपये गोळा करून संध्याकाळपर्यंत कधी चारशे, पाचशे तर दोनशे रुपय सुद्धा मिळत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. रिक्षा व्यवसायातून कुटुंब चालवणे सध्याच्या परिस्थितीत अवघड झाले आहे. आणि त्यात कोरोना मुळे तर आणखीच वाईट परिस्थिती झाली आहे. अशीच परिस्थितीती राहिली तर रिक्षा भंगार मध्ये विकावी लागेल.

 शहरात रिक्षांची भरमसाठ वाढलेली संख्या, टायर-ट्युब, पेट्रोल, सी एन जी गॅस, ऑईलचे वाढलेले दर आणि देखभालीचा वाढलेला खर्च या मुळे रिक्षा व्यवसाय डबघईला आला आहे. रिक्षाचा एकरकमी कर दहा ते बारा हजार रुपये आणि प्रत्येक वर्षी विम्यापोटी आठ ते दहा हजार रुपये हा न चुकणारा खर्चही कायमच आहे. प्रत्येक वर्षी वाहनाची पासिंग करावी लागते, त्यावेळी एजंटाला द्यावे लागतात दोन हजार रुपये, त्यानंतर मिटर शुल्क ५०० रुपये, इन्शुरन्स ९०००, रेडियम पाटी ५००, असे जवळपास १५००० वर्षाला रिक्षाचालक शासनाला देतो. तरीही त्यांच्या सोयी सुविधां संदर्भात साधा विचारही केला जात नाही. रिक्षाचालकांना रिक्षाचे हफ्ते, व्याज आणि मिळणारे उत्पन्न, घराचा खर्च, मुलांचे शिक्षण याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कष्ट करुनही पोट भरत नाही अशी परिस्थिती आहे.  भविष्य काळात रिक्षा चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार  हे नक्की.



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post