विशिष्ट नंबर मिळवून त्याद्वारे गाड्यांच्या नंबर प्लेटवर दादा, भाऊ, नाना, बॉस, असे लिहिणाऱ्यांना चाप


प्रेस मीडिया :

अनवरअली शेख : 

 पिंपरी - वाहनांच्या नंबर प्लेटवर दादा, भाऊ, नाना, बॉस अशा नंबर प्लेट पहायला मिळत होत्या. मात्र आता वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट आल्या आहेत. या नंबर प्लेटवर कुठलेही डिझाइन करता येत नाही.त्यामुळे विशिष्ट नंबर मिळवून त्याद्वारे गाड्यांच्या नंबर प्लेटवर दादा, भाऊ, नाना, बॉस, असे लिहिणाऱ्यांना चाप बसला आहे. परिणामी, अशा नंबरची मागणीही आता घटली आहे.


नवीन वाहनाला आवडीचा नंबर घेण्यासाठी अनेकजण वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जातो.

पूर्वी दादा, भाऊ, नाना, बॉस आदी नावे तयार होतील अशा नंबरला प्राधान्य दिले जात होते. मात्र, गाड्यांना हाय सेक्‍युरिटी नंबर प्लेट आल्याने त्यावर कुठलेही डिझाइन करता येत नाही. त्यामुळे अशा नंबरची मागणी आता घटली आहे.

दंडाचाही फटका

पिंपरी चिंचवडकर विशेषतः राजकीय नेते व कार्यकर्ते या फॅन्सी नंबरप्लेटसाठी हजारो तर कधी कधी लाखो रुपये मोजत होते. मात्र, हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेटमुळे याची क्रेझ संपली आहे. तसेच फॅन्सी नंबरवर वाहतूक पोलिसांकडून एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

वाहनचालक पसंतीच्या नंबरसाठी अर्ज करतात. काही ठराविक नंबरकडे वाहनचालकांचा अधिक कल पाहायला मिळतो. दादा, भाऊ, नाना अशा प्रकारची नावाच्या नंबरची जास्त मागणी होती. मात्र, हाय सेक्‍युरिटी नंबर प्लेट आल्याने त्यावर कुठलेही डिझाइन करता येत नाही. त्यामुळे अशा नंबरची मागणी कमी झाली आहे.

अतुल आदे,  पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

विविध नंबरला पसंती....

वाहनधारकांचा 9, 99, 999, 9999, 786, 0909 किंवा एकेरी अंकातील एक ते आठ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्मतारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. 15 ते 50 हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post