महापालिकेने हाती घेतला अनोखा प्लास्टीक व्यवस्थापन उपक्रम

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नवा उपक्रम..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अन्वरअली शेख :

रस्त्यात, अन्न कुठे ही पडलेल्या शितपेये अथवा पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या एकत्रित गोळा करण्यासाठी महापालिकेने प्रोत्साहन पर अनोखा प्लास्टीक व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. 

कचरा वेचक अथवा अन्य नागरिकांनी पाणी व शितपेयाच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या गोळा करून या विक्रेत्यांकडे जमा केल्यास या मोबदल्यात त्यांना चहा आणि वडापाव मिळणार आहे. पाच बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक वडापाव दिला जाणार आहे. तर, विक्रेत्यांना महापालिकेकडून प्रतिपूर्ती रक्कम दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत.पाच बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक वडापाव संबंधित हॉटेल व्यावसायिक अथवा विक्रेत्याने द्यावयाचा आहे.

या करिता इच्छूक असलेले शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांना महापालिकेसोबत काम करावे लागणार आहे. संकलीत केलेल्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्यांचे वजन महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यानंतर चहा, नाष्टा व जेवण यापोटी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती ही निवड केलेले छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी-हातगाडी विक्रेते यांना करण्यात येणार आहे. यासाठी या व्यावसायिकांना महापालिकेकडे अर्ज करून नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आरोग्य मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे नोंदणी करून अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

अनवर शेख : प्रेस मीडिया लाईव्ह.

Post a Comment

Previous Post Next Post