कुदळवाडी चिखली येथे उघड्यावर वैद्यकीय कचरा आढळून आल्याने

  लोटस हॉस्पिटलवर महापालिका आरोग्य विभागाची कारवाई.


प्रेस मीडिया ऑनलाईन : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड : चिखली परिसरात आज स्वच्छता विषयक पाहणी करताना रुग्णालयाचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळून आला . महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या तपासणीत कुदळवाडी चिखली येथे उघड्यावर वैद्यकीय कचरा आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने २५ हजार रुपयांचा दंडाची कारवाई लोटस हॉस्पिटलवर आज दुपारी केलेली आहे .


 त्या मधील केस पेपर वरून आरोग्य निरिक्षक वैभव कांचनगौडार व अमर सुर्यवंशी यांनी तपासणी केली असता लोटस हॉस्पिटलचे असल्याचे दिसून आले .त्यानंतर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व आरोग्य निरीक्षक वैभव कांचन गौडार यांनी डॉक्टर लाडे यांच्या बरोबर चर्चा केली . यापुढे वैद्यकीय कचरा योग्य पध्दतीने हाताळण्याबाबत सूचना दिल्या . वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी असे आवाहन करण्यात येत आहे .


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :  पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post