गिरीश कंटे लिखित 'आझाद दस्ता' या ज्ञानजिज्ञासा प्रकाशन संस्था नेरळ यांच्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन


प्रेस मीडिया ऑनलाइन :

नरेश कोळंबे :  कर्जत

 ज्ञानजिज्ञासा प्रकाशन संस्था, नेरळ यांच्या माध्यमातून गिरीश कंटे लिखित आझाद दस्ता च्या पुस्तकाची चौथी आवृत्तीचे प्रकाशन वडवली बदलापूर येथे झाले. त्यावेळी प्रामुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक श्री. वसंत कोळंबे व लेखक श्री. अनंतराव ओगले उपस्थित होते. क्रांतिवीर हुतात्मा हिराजी यांच्या बलिदाना नंतर आणि १९४७ ला येरवडा तुरुंगातून सुटून आल्यानंतर गोमाजी पाटील यांनी आधारासाठी बिरदोले येथील गोपाळ जामघरे यांना दत्तक घेतले. अनुसयाबाई जामघरे या गोपाळ जामघरे यांच्या पत्नी. त्यांच्या शुभहस्ते आझाद दस्ता या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन पार पडले.


    देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुताम्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. त्यातचं चारित्र्य संपन्न समाज उभा राहिलं यासाठी क्रांतिकारकांची चरित्रे वाचली गेली पाहिजेत. लिहिली गेली पाहिजेत असें प्रतिपादन इतिहास संशोधक श्री. वसंत कोळंबे यांनी आझाद दस्ता पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसून ते मिळवले आहे. यासाठी क्रांतिवीरांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते. याची जाणीव आज समाजात रुजवणे गरजेचे आहे. ज्ञानजिज्ञासा प्रकाशन संस्थेने हाती घेतलेले कार्य मोलाचे आहे, असें मत श्री. वसंत कोळंबे यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात 'आझाद दस्ता' च्या क्रांतिलढ्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक गोमाजी पाटील चे अध्यक्ष कल्पेश भोईर, प्रा. शिक्षक दिपक घिगे प्रा. हरेंद्र सोष्टे, प्रा. विजय कोंडीलकर, स्वातंत्र्यसैनिक झिपरू गवळी यांचे पुतणे वामन गवळी, प्रा. महेश मोरे, यशवंत माळी तसेंच ज्ञानजिज्ञासा प्रकाशन संस्थेचे नागेश धावडे, प्रदिप मोगरे, विक्रम विरले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद टोहके यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत माळी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post